<
पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्याफाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे दि. २६ जानेवारी रोजी भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजरोहणा सह विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पाळधीचे स.पो.नि. हनुमंत गायकवाड , शाळेच्या अध्यक्षा सौ.अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व भारत मातेचे पूजन करून सांस्कृतीक कार्यक्रम सुरु करण्यात आला. नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह नृत्य, नाटिकेच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिना विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अश्विनी ठाकरे व प्रतिभा शिवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल सोमनी यांनी केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्ज्वला झंवर, गुणवंत पवार, विजया मोरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपस्थित होते.