<
जळगाव- (जिमाका) – किनगाव बु. ता. यावल येथील आठवडे बाजार मंगळवारी भरविला जातो. परंतु मंगळवार दि. 28 जानेवारी रोजी महाशिवपुराण ग्रंथ पारायण सप्ताह समाप्ती होणार असल्याने यादिवशी महापुराण ग्रंथाची देखाव्यासह भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने मंगळवार रोजी भरणारा आठवडे बाजार बुधवार, दि. 29 जानेवारी रोजी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.