<
जळगाव : येथील मेहरूण भागातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व उच्च विद्यालयात शासकीय परिपत्रकाप्रमाणे “वॉटर बेल” उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बेल झाल्यावर पुरेसे पाणी पिले.
विद्यार्थ्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता राहून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते, हि बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर “वॉटर बेल” उपक्रम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढावे आणि त्यांच्या संभाव्य आजारांचा धोका टाळावा याकरिता “वॉटर बेल” उपक्रम आहे. त्यानुसार संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वॉटर बेल” उपक्रम संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास काय परिणाम होतात व पाणी वेळोवेळी तसेच कधी प्यावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.