Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है !

मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर यांचे रायसोनी व्यवस्थापन महाविध्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  

जळगाव – (प्रतिनिधी) – मुंबईचे डबेवाले आज जगभरात प्रसिद्ध आहेत. १८९० साली म्हणजेच  इंग्रजांच्या काळात मुबई डबेवाला या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा पासून आज पर्यंत अवितर सेवा आम्ही देत आहोत. व्यवसाय कोणताही असो त्यात आपले समर्पण महत्वाची भूमिका पार पाडते. व्यवसाय करण्यासाठी किंवा त्याला प्रगतीपथावर पोहचविण्यासाठी तुमचे नियोजन, वेळेचे महत्व, काम करण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाची शिस्तबद्धता आहे.  या सर्व गोष्टी आपल्याकडे असतील तर तुमचे काम तुमची ओळख निर्माण करण्याचे काम नक्की करेल त्यामुळे हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है ! असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले. जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट आयोजित  कार्यक्रमात  “डीफेक्ट फ्री ऑपरेशन मेनेजमेंट” या विषयवार ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई डबावाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर, रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, सौ, राजुल रायसोनी व्यासपीठावर उपस्थित होते.  पुढे बोलताना ते म्हणाले की,  की मुंबई कधी थांबत नाही, पण मुंबईमध्ये असंच कधीही न थांबणारं एक सैन्य आहे,  मुंबईचे डब्बेवाले फक्त पाच हजार लोकांची डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आगळीवेगळी सेना, न थकता, लोकांची सेवा करत आहे. मुंबईचे डब्बेवाले दररोज दोन लाखाहुन अधिक टिफीन सकाळी घरातुन कलेक्ट करतात, ज्याचा त्याचा टिफीन त्या त्या ऑफीसमध्ये बिनचुक पोहचवतात, आणि नंतर रिकामे डबे जमा करुन, ज्याच्या त्याच्या घरीही पोहोचते करतात. एकशे तीस वर्षांपासुन मुंबईचे डब्बेवाले भुकेच्या वेळेला डबे पोहचवण्याचं काम, नेटानं करत आहेत. तुलनेनं अडाणी असणार्‍या, निरक्षर लोकांचं व्यवस्थापन इतकं उत्कृष्ट आहे की ह्यांच्या मॅनेजमेंट आणि टिमवर्कला पाहुन जग थक्क होतं. यांचं कौतुक इंग्लंडचा राजकुमार प्रिंसनं चार्ल्स केलं, व्हर्जिन ग्रुपचे मालक रिचर्ड ब्रॅंन्सन ह्यांनी सुद्धा डबेवाल्यांची प्रत्यक्ष भेटुन स्तुती केली. जगातली टॉपची विश्वविद्यालये सुद्धा ह्यांची केसस्टडी करतात. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कित्येक नावलौकिक व अगणिक रुपयांची उलाढाल करणारे उद्योग, उद्योजक आहेत. परंतु जगप्रसिद्ध मुंबईची ओळख निर्माण करणारे मुंबईचे डबेवालेच आहेत. मुंबईचे डबेवाले म्हटले की, त्याची वेगळी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. त्यांचे काम, त्यांचे नियोजन, वेळेचे महत्व आणि वेगळेपण यामुळे सिक्स सिग्मा या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. व्यवस्थापन हा विषय प्रत्येक घटकाशी निगडीत आहे. त्यामुळे व्यवसाय क्षेत्रातील व्यवस्थापनाचे महत्व काय असते हे आपल्याला मुंबईच्या डबेवाला यांच्या कडून चांगल्याप्रकारे शिकता येईल असे मत त्यांनी  व्यक्त केले. यावेळी जळगाव शहरातील १० कुशल डब्बेवाल्यांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रफिक शेख यांनी मानले तर  प्रा. मकरंद वाठ, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन, प्रा. आकाश पाटील, प्रकाश शर्मा व प्रा. तन्मय भाले यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.     

सुभाष तळेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले मुद्धे

१) टाईम मॅनेजमेंट

जेवणाचा डबा जेवणाच्या वेळेत पोहोचला तरच त्याला महत्व आहे. मुसळधार पाऊस पडो, महापुर येवो किंवा महाभयंकर ट्रॅफिक जाम असो, डबेवाले कधीही लेट होत नाहीत. ठरलेल्या वेळी ते डबा कलेक्ट करतील, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ते डबा पोहचवतीलच. कामातला हा चोखपणा त्यांची वेगळी ओळख निर्माण करतो. डबावल्यांचे दिवसातले कामाचे तास म्हणजे फक्त सहा घंटे आहेत. पहील्या तीन तासात ते घरातुन डबे जमा करतात. नंतरच्या तीन तासात ते ऑफीसातुन डबे घेऊन घरी वापस देतात. कधीही, कसल्याही परिस्थीतीत डबेवाले आपल्या वेळेची मर्यादा तोडत नाहीत, म्हणुनच की काय एका टिफीनवर सुरु झालेली ही सेवा आज दोन लाख डब्यांवर पोहोचली आहे. ह्यात खुप महत्वाचं सुत्र दडलेलं आहे, “जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करु शकत नसाल, तर तुमच्या आयुष्यात काहीही मॅनेज करु शकत नाही.”

२) शिस्त

मुंबईचे डब्बेवाले स्वतःतर शिस्त पाळतातच, त्यासोबत ग्राहकांनाही शिस्त लावतात. एखाद्या घरी डबा घेण्यासाठी गेल्यास तो डबेवाला मोजुन चार मिनीटे डब्याची प्रतिक्षा करतो, आणि पाचव्या मिनीटाला तो घर सोडतो. त्यांच्या ह्या शिस्तीमुळे ग्राहक आपापले डबे तयार ठेवुन त्यांची वाट बघतात. जे ग्राहक वारंवार उशीर करतात, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात, आणि अशा कस्टमरला सेवा देणे डबेवाल्यांकडुन थांबवले जाते. मुंबईच्या ट्रेनमध्ये डबे घेऊन जाणं आणि वापस आणणं अतिशय अवघड आहे, आपसुकच लोकांकडुनही डबेवाल्यांच्या ह्या शिस्तप्रियपणाचा मान राखला जातो. शिस्त असल्याचा अजुन एक फायदा आहे, हे लोक नेहमी व्यस्त असतात. जे लोक शिस्तीत जगतात, त्यांच्या जीवनात फालतुचे टेंशन नसतात, त्यांचं पुर्ण लक्ष त्यांच्या कामावर असतं. एकाग्रतेमुळे उत्पादनक्षमता वाढते. शिस्तप्रिय लोकांचं समाजात कौतुक होतं. अशा लोकांवर, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला जातो.

३) निष्ठा

मागच्या एकशे तीस वर्षांपासुन फक्त आणि फक्त एकच काम. डबे पोहचवण्याचं. संपुर्ण फोकस त्या एकाच कामावर. त्यामुळेच की काय, मुंबईचे डब्बेवाले हे काम अतिशय उत्कृष्ट्पणे करत आहेत. कुठलाही धंदा तेव्हा अपयशी होतो, जेव्हा आपल्या मुळ हेतुपासुन तो दुरावतो. काम सुरु करताना एक उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवलेला असतो, पण तो हेतु विसरताच, कामातला अनोखेपणा, विश्वासार्हता आणि गुडविल हरवायला लागतं. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे डबेवाल्यांची सेवा इतकी जलद आणि अनोखी बनलीय की त्यांचा सिक्स सिग्मा सर्टिफिकेट देऊन गौरव केला गेला आहे.

४) कामावर प्रेम करा

बहुतांश डबेवाले हे वारकरी संप्रदायाला मानणारे असतात. भुकेलेल्यांना अन्न पोहचवणे हे खरोखर पुण्यांचं काम! भक्तीभावाने ते हे काम मनापासुन करतात, म्हणुन उन्हातान्हात काम करताना ते त्रासुन जात नाहीत, थंडी पावसात काम करताना ते कुरकुरत नाहीत. खचाखच भरलेल्या लोकलचाही त्यांना त्रास होत नाही, कारण विठ्ठलाच्या नामस्मरणातुन त्यांना उर्जा मिळते. डबा पोहचवणं, ही त्यांच्या लेखी एक प्रकारची भक्ती आहे. म्हणुन सेवाभावाने ते काम आनंदाने करतात. आपल्या प्रोफेशनबद्द्ल आपल्याला सन्मान असावा, आपलं आपल्या कामावर मनापासुन प्रेम असावं, ते काम करताना वेळेचं भानही जाणवु नये, पॅशनने केलेल्या कामात यश मिळतचं मिळतं

५)टिमवर्क

दोन लाख डब्यांची देवाणघेवाण शक्य कशी होते, त्यासाठी प्रत्येक डब्यावर एक कोड असतो, तो इतका अवघडही नाही की नवख्या माणसाने गोंधळुन जावे पण तो इतका विशिष्ठ नक्कीच आहे, की डबा बरोबर ज्याचा त्याला मिळतो. प्रत्येक डबेवाला आपापल्या एरीयातले डबे एकत्र करतात आणि स्टेशनला पोहचवतात, काही मिनीटात त्या त्या कोडवरुन डब्यांची सॉर्टींग केली जाते, ज्या त्या भागातले डबे त्या त्या लोकलमध्ये ठराविक डबावाल्यांकडे दिले जातात, जो तो डबेवाला आपापल्या एरीयातले डबे घेऊन आपल्या एरीयात जातो, आणि डबे पोहचवतो. हा सारा प्रवास सायकलीवरुन आणि लोकलच्या डब्यांमधुन केला जातो. ह्या साखळीमध्ये टीमवर्कला अफलातुन महत्व आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

Next Post

ज्ञानाचा कसोशीने उपयोग केल्यास रोजगार निश्चित: वासुदेव महाजन

Next Post

ज्ञानाचा कसोशीने उपयोग केल्यास रोजगार निश्चित: वासुदेव महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications