<
प्रतिनिधी(जळगांव)- श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हुतात्मा दिन व कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांचा हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शाळेतील उपशिक्षिका मोहिनी सुरवाडे यांनी देशाच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या वीर जवानांची आठवण करून दिली तसेच हुतात्मा दिन का साजरा करतात या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच चैताली पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कुष्ठरोग निवारण दिन या विषयी देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मुख्यध्यापिका हर्षाली पाटील यांनी गांधीजींच्या जीवनातील काही प्रसंग व जीवनसरणी त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक राहुल पाटील,सद्दाम तडवी, उपशिक्षिका अश्विनी पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे, जयश्री पाटील, जयश्री सपकाळे, दिपमाला बाविस्कर, आदींनी सहकार्य केले.