<
नूतन मराठा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उदघाट
जळगाव-जीवनात मनसोक्तपणे जगत असताना शिस्तपालन करणे व मूल्यविवेक जपणेदेखील महत्त्वाचे आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकत असताना रोजगाराच्या संधींनादेखील उपलब्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी केले.
जजिमविप्र संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या उडान -2020 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अकबर पटेल यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएनआयएफडी संस्थेच्या संचालिका संगिता पाटील, संमेलनप्रमुख प्रा.डॉ.डी.एल.पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जी.पाटील, डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.डॉ.आर.बी.देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. यावेळी संगिता पाटील यांनी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिंनी असल्याचा अभिमान व्यक्त करीत विद्यार्थ्यांचे यशस्वी होवून महाविद्यालयाचे नाव उंचवावेे, असे सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे प्रसिद्ध हलगी सम्राट नाटक दाखविण्यात आले. नाटकातील सागर भंडगर याची झी-वाहिनीवरील कार्यक्रमात निवड झाल्याबद्दल मान्यवरांनी त्याचे कौतुक केले.यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुविधेचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उकृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.डॉ.अफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.आर.बी.देखमुख यांनी मानले.
सांस्कृतीक कार्यक्रमांनी आणली रंगत
उद्घटनानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सुरुवातीला एकल, समुह व शास्त्रीय गायन घेण्यात आले. यात गणेशवंदना सुुरुवात करत मराठी, हिंदी सिनेमाची गिते, विविध लोकगिते, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या सादर झाल्या. खंडरायाच्या लग्नाला… क्या हुआ तेरा वादा… चांदण झाली रात… वाढीव दिसतय राव… यासह मराठी अहिराणी रिमिक्स गितांनी उपस्थितांची मने जिंकत टाळ्याचा प्रतिसाद मिळविला.यानंतर समुह, एकल नृत्य सादर झाले. यात आई भवानी तुझ्या कृपेने…पहिली बार है जी… ये इतना जरुरी कैसे हुआ… ओ लडकी आंख मारे… या गितांवरील नृत्यांनी वन्समोअर मिळवत विद्यार्थ्यांना फिरकायला भाग पाडले. योगेश पवार याने योगा नृत्य करीत वाहवा मिळवली. मुकेश सावकारे याने एकपात्री नाटक सादर केले. तसेच आदिवासी समाजातील गिताचे समुह नृत्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आज समारोप
महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी 31 रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध परीक्षांमधील गुणवंत तसेच पीएच डी धारक शिक्षक, स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही.आय.परदेशी यांची उपस्थिती राहील.