<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डांगर, लेखापाल अजिंक्य गवळी, जिंदगी फाउंडेशनचे अध्यक्ष अजय पाटील, सुष्मिता भालेराव, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भुषण लाडवजांरी, सत्यमेव जयते न्युज चे मुख्य संपादक दिपक सपकाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. श्री नरेंद्र डांगर यांनी भाषणात आपले मनोगत व्यक्त केले. तर जिंदगी फाउंडेशनचे अजय पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घटनांना उजाळा देऊन जवानांच्या कार्याविषयी माहिती देऊन उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन युवा स्वयंसेवक शिवदास कोचूरे यांनी केले. तर आभार विकास वाघ यांनी केले. यशस्वीतेसाठी आनंदा धनगर, स्वप्नजा हिवरे यांनी परिश्रम घेतले.