<
जळगाव-(जिमाका) – शासकीय टंकलेखन यंत्र दुरूस्ती कर्मशाळा-नाशिक येथील दुरूस्ती कर्मशाळा प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन /प्रतिलिपी यंत्राची संधारण व दुरूस्ती करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला व त्या तारखेस कार्यायीन सुट्टी असल्यास त्यापुढील कर्तव्याच्या दिवशी कर्मशाळा सुरू असेल.तरी ज्या शासकीय कार्यालयातील टंकलेखन यंत्रांची संधारणा वा दुरूस्ती करावयाची असेल त्या सर्व शासकीय कार्यालयांनी याची नोद घ्यावी असे संचालक,शासकीय मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.