<
पहूर ता.जामनेर- (प्रतिनिधी) – छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (महाराष्ट्र शासन च्या इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि महाराष्ट्र शासन च्या विशेष मागास प्रवर्ग कल्याणा साठी साय्यत्त संस्था) असून तारादूत पथदर्शी प्रकल्पात अंतर्गत ‘लेक वाचवा ,लेक शिकवा’ मोहीम पथनाट्य सादर करून व ‘स्त्री-पुरूष समानता’या विषयावर अतिशय मार्मिक उदाहरण शाळा ,महाविद्यालय येथे सादरीकरण करत आहे. लोकमत ‘सरपंच ऑफ दि इयर’ प्राप्तकर्त्या विद्यमान सरपंच पहुर सौ.निताताई रामेश्वर पाटील यांची प्राथमिक भेट घेऊन सारथी संस्थे विषयी सविस्तर माहिती दिली, संपूर्ण टीम व संस्थे मार्फत गुलपुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . पहूर येथे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, आर. बी.आय.कन्या माध्यमिक विद्यालय, आर.टी. लेले. उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद कन्या व मुलांची शाळा तसेच राणी दानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन माध्यमिक विद्यालय ,गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय, वाकोद येथे पथनाट्य ची टीम मुकेश शिंदे सर(जिल्हा प्रकल्प समन्वक/तारादूत यावल), तेजश्री जाधव (भुसावळ तारादूत), नीता अरुण पाटील (तारादूत जळगाव), कीर्ती पाटील (तारादूत पाचोरा),प्रमोद चौधरी(तारादूत मुक्ताईनगर), विजय कुलकर्णी ( तारादूत बोदवड), राहुल पाटील व गणेश म्हस्के (तारादूत जामनेर तालुका) ही संपूर्ण टीम श्रीमती.नीता पाटील मॅडम (प्रकल्प अधीकारी जळगाव जिल्हा) यांच्या मार्गदरर्शनाखाली काम करीत आहे .यावेळी शाळा, महाविद्यालय कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे व संस्थेचे उपक्रम महत्वाकांक्षी आहे असा अभिप्राय मिळत आहे.