<
जळगाव – (प्रतिनिधी) – विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती माध्यमिक शाळेत महात्मा गांधींच्या जीवनकार्यातून व त्यागातून ७२ व्यां पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. सुवर्णा पाटील यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दीपक बारी सर व उज्वला दंडवते उपस्थित होते.सदरील पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणातून सुवर्णा पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या,”आपण भारतीयांनी महात्मा गांधींच्या जीवन कार्याची व त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. महात्मा गांधी ना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे सुद्धा म्हणता येईल. महात्मा गांधींनी आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामुळे ते राष्ट्रपिता म्हटले गेले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री दीपक बारी सर म्हणाले की, महात्मा गांधींनी आपल्या कृतीतून स्वच्छता मोहीम आयुष्यभर राबविली.महात्मा गांधी म्हणायचे या देशात स्वच्छता राहील त्या देशाच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. स्वच्छतेच्या उपक्रमावर आपले मौलीक विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला दंडवते यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अनिल वाघ यांनी केले.