<
के. सी. ई. बी.एड. च्या रा.से.यो. अंर्तगत व्याख्यानातून जनजागृती
जळगाव-(प्रतिनिधी)-येथील के सी ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसन विरोधी मानसिकता निर्माण व्हावी तसेच त्यांना व्यसन मुक्त राखणे यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्रात ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ राबवीत आहेत. या अभियाना अंतर्गत के.सी.ई. सोसायटीच्या ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना जळगाव येथील कर्करोग तज्ञ डॉ. नितीन चौधरी यांनी ‘तंबाखूमुळे होणारे नुकसान व कर्करोगापासून सावधान’ या विषयावर व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर नाशिकचे डेप्युटी मॅनेजर राहुल सूर्यवंशी यांनी काही व्यक्तींचे अनुभव सांगून तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजाराविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
सदरील कार्यक्रम हा के सी ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. शैलजा भंगाळे, प्रमुख पाहुणे जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. नितीन चौधरी, श्री. राहुल सूर्यवंशी, रॉ. से. यो. विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना चौधरी, के. सी. ई. चे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार हे होते.कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्रा. प्रविण कोल्हे यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन डॉ.वंदना चौधरी यांनी केले.याप्रसंगी, श्री. मोहन चौधरी यांचे सुद्धा अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास डॉ.जे.बी.पाटील, प्रा. आर. सी. शिंगाणे, प्रा. केतन चौधरी, डॉ. एस. व्ही. चव्हाण, प्रा. गणेश पाटील, प्रा. पंकज पाटील, प्रा. अंजली बन्नापुरे, प्रा. केतकी सोनार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.