<
जळगांव(प्रतिनिधी)- मालेगाव ता. जिल्हा नाशिक येथील प्रकाशदायी एज्युकेशन अँन्ड वेल्फर सोसायटी मालेगाव जि नाशिक या संस्थेकडून विविध विभागात भरीव अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध कलागुण संपन्न व्यक्तींना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री वंदनीय मौलाना आझाद यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे प्रशांत राज तायडे राष्ट्रीय हरित सेनेच्या व काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध प्रकारचे पर्यावरण पूरक कार्यक्रम विद्यालयात तथा गाव पातळीवर सामाजिक जनजागृती साठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी पर्यावरण बचाव या हेतूने सतत पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवित असतात कागदी पिशव्या बनवून त्यांचे वाटप करणे गणेश उत्सव मध्ये निर्माल्य संकलन करणे फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वीपणे राबवणे विद्यार्थ्यांकडून पत्रक भरून घेणे दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे व मिठाई वाटप करणे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बी संकलन करणे असे विविध सामाजिक पर्यावरण पूरक कार्यक्रम सर राबवीत असतात सरांच्या या कार्याबद्दल प्रकाशदायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी पुरस्कार वितरण सोहळा संयोजक नुरुद्दिन मुलाजी कासोदा ता. एरंडोल यांनी तायडेंना लिहून पत्र दिले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, प्रा. गोपाल दर्जी, प्रा.वासुदेव पाटील, चेअरमन माणिकराव पाटील, उपाध्यक्ष भागवत पाटील, सचिव रामभाऊ पाटील, हरीत सेना मास्टर प्रवीण पाटील, महाराष्ट्र राज्य मापदा अध्यक्ष विनोद तराळ, यु डी पाटील, संदीप देशमुख, कृ.उ.बा.स.संचालक प्रशांत महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, गटनेता पियुष महाजन, प्राचार्य आर ए चौधरी, किशोर पाटील कुंझरकर, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक पर्यावरण प्रेमी मित्रपरिवार विद्यालयातील सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे अभिनंदन केले.