<
महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे जळगावात घंटानाद आंदोलनाला पाठिंबा पत्र
जळगांव(प्रतिनीधी)- जुनी पेन्शन मिळावी डीसीपीएस कपाती चा हिशोब मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर जुनी पेन्शन हक्क संघटना वतीने आज घंटानाद व निदर्शने करण्यात येत आहे यात जिल्हा परिषदेतील जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी गोविंदा ठाकरे व सर्व पदाधिकारी सहभागी झाले असून राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी दुपारी दीड वाजता राज्य समन्वय समितीच्या काल पुणे येथील राज्यव्यापी मीटिंग नुसार आंदोलनस्थळी भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवून राज्य समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन देण्यासंदर्भात जाहीर पाठिंबा राज्य समन्वय समितीच्या लेटरहेड वर दिला. गोविंदा ठाकरे, नाना पाटील, विपीन पाटील, संदीप पाटील, आतील सर्व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व पदाधिकारी पाचशेहून अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झालेले आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे यांनी राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझररकर यांचे आभार व्यक्त केले, यावेळी संदीप पाटिल, कमलेश महाजन उपस्थित होते. राज्य शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्यक्त करून पाठिंबा स्वीकारला.