<
जळगाव-प्रतिनिधी)-येथील के.सी.ई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी 31 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. सर्वप्रथम कार्यालयीन कर्मचारी नितीन पाटील,राजेश बागुल कुलसचिव जगदीश बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. प्राचार्यांना फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यात त्यांनी डॉ. उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्यपद्धतीविषयी तसेच एक सामान्य माणूस म्हणून किती मनमिळाऊ आहेत याबद्दल मत व्यक्त केले.
मू.जे.महाविद्यालयात मी पाच वर्षापूर्वी रुजू झालो. हे महाविद्यालय आहेच पण त्याहीपेक्षा हे नंदनवन आहे. येथे आल्यावर मनाला दिलासा मिळतो असे बोलतांना त्यांना गहीवरून आले होते. महाविद्यालयातील आँटोनॉमस इन्चार्ज डॉ. स. ना. भारंबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीश बोरसे, प्रा. राजेश बागुल, प्रसाद देसाई, पी. पी. महाजन, प्रा. आरती गोरे, श्रीकृष्ण बेलोरकर, स्वाती संवत्सर, सुरेखा पालवे,डॉ. केतन नारखेडे, डॉ. योगेश महाले,सुभाष लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. के. सी. ई. सोसायटीच्या सर्व प्रमुखांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ अशोक राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ स. ना. भारंबे, प्रा. डॉ. गौरी राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, प्रा. करूणा सपकाळे, प्रा बी. एन. केसुर, प्रा.कुमार रेड्डी, प्रा. डॉ. ए. पी. सरोदे तसेच डॉ. उदय कुलकर्णी सपत्नीक तसेच आदी मान्यवर उपस्थीत होते.