<
जळगाव -प्रतिनिधी)-येथील ‘चला सुदृढ व निरोगी आयुष्यप्राप्ती साठी सूर्यनमस्कार घालू या’. या संकल्पनेच्या आधारित सूर्यनमस्कार दिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयाच्या मानवी मूल्य प्रशाळे अंतर्गत सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नँचरोपँथी, आणि वेद इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार’ ह्या संकल्पनेनुसार सूर्यनमस्कार दिनाचा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (संचालक एकलव्य क्रीडा संकुल), प्रमुख वक्ते डॉ. प्रा. व्ही. एस. कंची (ग्रंथालय प्रमुख तथा तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक), विशेष उपस्थिती गिरीधर नेमाडे (कॅबिनेट सेक्रेटरी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंकज खाजबागे व वेद इव्हेंट्स च्या सौ. सरिता खाचणे यांनी केले. सूत्र संचालन व आभार प्रा गीतांजली भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार व विश्वकल्याण प्रार्थना रत्नप्रभा चौधरी यांनी केली.
भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण आणि उत्सव आहे. ही संस्कृती सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते त्या अनुषंगाने सूर्यदेवते प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथ सप्तमी हा सण साजरा केला जातो. म्हणून या दिवशी रथसप्तमी सोबत सूर्यनमस्कार दिन सुद्धा आपण साजरा करत असतो. आरोग्यं भास्करात इच्छेत| म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी सूर्यनमस्कार नियमित घातले असता शारीरिक बळ, मनोबळ तसेच समंत्रसहित सूर्यनमस्कारामुळे आत्मबळ सुद्धा वाढते असे प्रा. डॉ. व्ही. एस कंची सर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तसेच डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी रथ सप्तमी व सूर्यनमस्काराचे महत्व यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.कल्याणी चौधरी (एम. ए. योग शास्र विद्यार्थिनी) हिने उपस्थितांकडून सूर्यनमस्काराचे शास्रशुद्ध पद्धतीने करवून घेतले. या दिनाचे औचित्य साधून निसर्गोपचार विभागाकडून विविध आकर्षक योजनांवरती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा यानिमित्त करण्यात आली. सूर्योदय ते सूर्यास्त योग विभागात आलेल्या साधकांकडून सूर्य नमस्कार शास्रशुद्ध पद्धतीने करून घेण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी साधकांनी भरभरून प्रतिसाद दिला. योग विभाग संचालिका प्रा. आरती गोरे व प्रा. डॉ. देवानंद सोनार, प्रा. अनंत महाजन,प्रा. सोनल महाजन यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे, सौ. रत्नप्रभा चौधरी, सौ डिम्पल रडे, सौ नूतन राऊत, विकास खैरनार, सौ. माधवी तायडे, योग व निसर्गोपचार विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.