
जळगांव(प्रतिनीधी)- येथील कॅपेला इंटरनॅशनल स्कुलमध्ये दिनांक २ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शरयु विसपुते तसेच निलेश चौधरी, वंदना चौधरी होते. तसेच संस्थेचे चेअरमन सुशील चौधरी मुख्यध्यापिका काजल कोळी व इतर शिक्षक रिता लाठी, योगिता सुरवाडे, मयुरी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत इंगळे यांनी केले. तसेच, विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.