<
जळगाव-(प्रतिनिधी) – वृक्षवल्ली आम्हा सोयरी” या म्हणी नुसार शासनाने वृक्षावर प्रेम करा. त्याची लागवड करा. असा संदेश सामाजिक वनीकरण विभाग तर्फे करण्यात आला आहे.पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा सामाजिक आरोग्यावर,जीवनचक्रावर,जलचक्रावर एकूणच नैसर्गिक साधनस्रोतांवर तसेच शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.हाच उद्देश आणि एक आदर्श समाजापुढे निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी प्रगती विद्यामंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत वृक्षारोपण करून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचावा असा बहुमोल संदेश दिला आला आहे. या उपक्रमाचे सर्व परिसरात कौतुक होत आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी,हरितसेना सदस्य शिक्षक मनोज भालेराव, अनिल वाघ, कीर्ती तळेले, सुवर्णा पाटील रमेश ससाणे, पंकज नन्नवरे,सुभाष शिरसाठ,दिपक बारी, धनश्री पाठक,प्रियांका वाणी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्काऊड गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते.