<
भडगांव – (प्रतिनिधी) – येथील विरभगतसिंग गणेश मंडळ यशवंतनगर भडगाव येथे सालाबादा प्रमाणे दि.22 जानेवारी 2020 ते 29 जानेवारी 2020 पर्यंत हरीनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. सदरचा सप्ताहात येणार्या महिला वर्गसाठी लकी ड्रा ठेवण्यात आला होता सप्ताहात किर्तन ऐकनासाठी येणार्या प्रत्येक महिलांचे नाव एका चिट्टीत लिहुन ते एका बंद खोक्यात टाकण्यात अाले होते. ते बंद खोका सप्ताहाचे काल्याचे किर्तन झाल्यावर सर्वांच्या समक्ष एकुण 111 महिल्यांचे नाव त्या खोक्यातुन काढण्यात आले होते. त्यांना प्रतेकी 111 महिलांना वैयक्तीक बक्षीस म्हणुन 111 गणपती ची फोटो फ्रेम हर्षा विठ्ठल पाटील व आशा अनिल महाजन या महिलांच्या हस्ते लकी ड्रा विजेता महिलांचा स्टेजवर सत्कार करून देण्यात आल्या. हा महिलांसाठी सप्ताहात एक नाविण्य पुर्वक उपक्रम विठ्ठल कौतिक पाटील व अनिल जगन्नाथ महाजन यांच्या मार्फत वैयक्तीक रित्या स्वखर्चाने राबविण्यात आला. हा हरीनाम किर्तन सप्ताहात किर्तन ऐकाला येणार्या महिलांना एक प्रतिसाद म्हणुन हा पायंडा पाडण्यात आला आहे. ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . गेल्या अकरा वर्षापासुन काहीना काही उपक्रम राबवुन किर्तन ऐकनांरे श्रोत्यांसाठी समाज प्रबोधन करत असतांना अागळा वेगळे उपक्रम हाती घेवुन अापण समाजाची सेवा करून यात अापला सिहांचा वाटा असावा असे सर्वांना वाटावे व कार्यक्रमाची शोभा वाढवुन किर्तनाची गोडी वाढावी व चांगला प्रतिसाद प्रत्येक वर्षी मिळावा हाच हेतु आयोजकांचा आहे. हा सप्ताह भडगाव तालुक्यात एक नंबर भव्य दिव्य स्वरूपात पार पडतो यात सर्व ग्रामस्थ व देणगी दारांचा फार मोठा हातभार असतो.श्र्वोते वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात म्हणुन हा सप्ताह चांगले किर्तनकार आणुन जनजागृती करण्याचे काम विरभगतसिंग गणेश मित्र मंडळ यशवंतनगर हरीनाम किर्तन सप्ताहात करू शकतात हे मात्र कडू सत्य आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात शाम महाराज गृप पिंपळगाव, स्वराजंली गृप, विरभगतसिंग गणेश मित्र मंडळ व भडगाव शहरातील सर्व मंडळ, विविध संघटना पदाधिकारी सर्व दानशुर व्यक्तींचा सहभाग असतो.