<
ग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ग्रेस अकेडमी आणि टॉडलर्स अकॅडमी वार्षिक स्नेहसंमेलनात विदयार्थ्यांचे रंगतदार सादरीकरण
चाळीसगाव -(प्रतिनिधी) – प्रत्येकाच्या आयुष्यात आई ही पहिले संस्कार विद्यापीठ आहे. जन्मापासून आईची कुशीत असतांनाच संस्काराची पाठशाळा सुरू होते.मात्र विद्यार्थी दशेत ही जबाबदारी शाळेवर येते.यासाठी चांगले वातावरणात संस्कारक्षम शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. ग्रेस अकॅडमीने देखील ही संस्कारक्षम शिक्षणाची परंपरा जपली असून ही शाळा पालकांच्या कसोटीला उतरली आहे.भव्य क्रीडांगण लाभलेल्या ग्रेस अकॅडमीने विदयार्थ्यांच्या सर्वांगीण उज्वल भविष्यासाठी सात्यत्याने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.असे गौरवोद्गार उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.ग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ग्रेस अकेडमी आणि टॉडलर्स अकॅडमी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटन त्यांचे हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती अजय पाटील ,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चव्हाण,डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ, हातले शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,संस्थेचे अध्यक्ष विश्वास बारीस सर,टॉडलर्स प्रमुख पुष्पा बारीस ,राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख ,उमंग कोअर कमिटी सदस्या साधना पाटील यांचे सह मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून स्नेह संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.प्रास्तविकातून संस्थेचे संस्थापक सचिव विश्वास बारीस यांनी शाळेच्या शंभर टक्के यशस्वी निकालासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. मुख्याध्यापक संजय वाघ यांनी शाळेच्या प्रगती मध्ये संस्था सचिव विश्वास बारीस यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्या नेतृत्वात शाळेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण चोरट, शंकर घायल, सुधीर आमले, गणेश निकम, मयुर बागुल, करण पाटील, रणधीर जाधव ,गणेश पवार ,धनंजय बोरसे आदींनी परिश्रम घेतले. पुष्पा बारीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक गाण्यांवर,नृत्य, विविध नाट्यछटा, सामूहिक नृत्य सादर केले.शेकडो पालकांची यावेळी उपस्थिती होती.शाळेच्या वतीने अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात आल्याने स्नेहसंमेलन चार तास चालला. सूत्रसंचालन कवी गणेश निकम यांनी तर आभार किरण चोरट यांनी मानले .