<
अभाविप आयोजित मिशन साहसी अभियान स्वागत समिती अध्यक्ष पदी – डॉ.प्रीती अग्रवाल व सचिव – प्रतिमा याज्ञिक
जळगाव – (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभरात मिशन साहसी या अभियान द्वारे विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अभाविप, जळगावच्या वतीने ३ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील विविध महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. तसेच ११ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव या ठिकाणी मिशन साहसी प्रत्याशिक्षाकांचे भव्य सादरीकरण सकाळी ०८ ते ११ दरम्यान होणार आहे. या अभियानासाठी भव्य प्रात्यक्षिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू बबिता फोगाट व अभाविप पश्चिम क्षेत्र विद्यार्थिनी प्रमुख प्रीती नेगी उपस्थित राहणार आहेत असी माहिती अभाविप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या अभियानासाठी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील महिलांची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. यात स्वागत समिती अध्यक्ष – डॉ.प्रीती अग्रवाल, कार्याध्यक्ष – डॉ.आरती हुजूरबाजार, सचिव – प्रतिमा याज्ञिक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या अभियाना अंतर्गत जळगाव शहरतील ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या अभियानात जास्तीत जास्त सहभागी व्हावे व शहरातील सर्व नागरिकांनी या अभियानास सहकार्य करावे असे आव्हान पत्रकार परिषदेत अभाविप च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केले. या वेळी अभाविप महानगर मंत्री रितेश चौधरी, मिशन साहसी संयोजिका रिद्धी वाडीकर उपस्थित होते. सर्व विद्यार्थिनींनी अभियानात सहभागी व्हावे व विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे हे अभियान खूप चांगला उपक्रम आहे सर्व जळगावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले.
स्वागत समिती पुढील प्रमाणे
संरक्षक
मा.खा.रक्षा खडसे, रावेर लोकसभा
मा.आ. स्मिता वाघ, महाराष्ट्र विधानपरिषद
मा.सौ.रंजना पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा, जळगाव
मा.सौ.भारती सोनवणे, महापौर जळगाव
मा.सौ.साधना महाजन, नगराध्यक्षा, जामनेर
अध्यक्षा : डॉं.प्रीती अग्रवाल
कार्याध्यक्षा : डॉ.आरती हुजूरबाजार
उपाध्यक्षा : सौ.मंगला बारी
सचिव : सौ.प्रतिमा याज्ञिक
सहसचिव : सौ.स्वाती भावसार
सदस्य : सौ.रेवती शेंदुर्णीकर, सौ.डॉ.एकता चौधरी, सौ.डॉ.जयंती पाटील, कु.यामिनी कुलकर्णी, सौ.सुधा काबरा, सौ.सुचिता हाडा, सौ.मीनल नारखेडे, सौ.पद्मजा अत्रे, सौ.श्रद्धा लड्डा, कु.सई जोशी, सौ.मनीषा खडके, सौ.क्षमा फेगडे, सौ.मीनल पटेल, सौ.डॉ. विशाखा पाटील, सौ.संध्या सूर्यवंशी, सौ.सुप्रिया राणे, अभाविप महानगर अध्यक्ष प्रा.डॉ. भूषण राजपूत, महानगर मंत्री -रितेश चौधरी,