<
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात समारोप ; ४०० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
जळगाव, ता. ५ : जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे “कश्ती” वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘भारतातील संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रायसोनी इस्टीट्यूट गेली अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या इस्टीट्यूट मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या महाविध्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून इस्टीट्यूटचे व आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करावे, असे रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीतांवर नृत्य व गायन स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण केले. यावेळी स्पर्धक व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला. कश्तीचे विशेष आकर्षण ठरले शिवाजी महाराजांचा “अफजल खानाचा वद” हा पोवाडा. पोवाड्याच्या थरारक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेकाक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी विविध महाविद्यालयातून नृत्य, गीत गायन, कल का नायक व केस स्टडी, अंताक्षरी, फेस पेंटिंग, रांगोळी, पोस्टर सादरीकरण या स्पर्धांमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेटमध्ये सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय युवा महोत्सव कश्ती २०२० या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी एकल नृत्य, समूह नृत्य, रॅम्प वॉक या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होते.
कल का नायक या स्पर्धेत बेरोजगारी, शिक्षणाचे महत्व, पाणी प्रश्न, मतदान अधिकार, पर्यावरण सुरक्षा, लव मेरेज की अरेंज मेरेज, सामाजिक जबाबदारी, मानवी स्वभाव व वर्तणूक अशा अनेक विषयांवर चित्रफिती दाखवून स्पर्धकांना त्याविषयी आपले मत व्यक्त करायचे होते. एखाद्या विषयावर त्याच क्षणाला आपले मत व्यक्त करणे ही खूप कसरतीचे काम आहे. परंतु विद्यार्थ्यांची विचार क्षमता व संवाद सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. तसेच पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक विषयांशी निगडीत पोस्टर सादर केले. केस स्टडी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापनातील जी.एस. टी, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स आदी विषयांवर सखोल चर्चा केली. कार्पोरेट जगतात पाउल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून चुरशीने स्पर्धा खेळल्या. विध्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साध्य व्हावा, सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती जाणीव निमार्ण व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धा घेण्यात आले होते.
नृत्य व गायन स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.रफिक शेख, प्रा.प्रशांत देशमुख, प्रा.मोनाली नेवे, प्रा. वर्षा इंगळे, कल का नायक या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. विजय गर्गे, प्रा.डॉ. दिपक शर्मा तर पोस्टर स्पर्धेचे प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रुपाली ढाके, अपूर्वा पिल्ले यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज कांकरिया, प्रा. प्रशांत देशमुख, मनीषा रेदासनी, प्रिन्स यांनी केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी “कश्ती” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. रफिक शेख, प्रा राज कांकरिया व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.