<
छोटे चित्रकार घरात आमच्या
आमचे नातू छोटे चित्रकार
चित्र रंगवती सुंदर सुंदर
भिंतीवरती अपार
रंग दिला घराला आम्ही
केले खर्च तीस हजार
काय त्याची परवा त्याना
ते तर छोटे कलाकार
घड्याळ झाडे फुले वेली
अशी त्यांनी चित्रे रंगवली
कल्पनेने जे जे झाले
ते ते त्यानी चित्रे साकारली
आडव्या तिडव्या गोल गोल लांबट वाकड्या तिकड्या रेषानी
काढीले चित्र सुंदर सुंदर त्याच्या कलाकुसरीनी
काढून चित्र भिंतीवरती
त्यांना आनंद होतो फार
ओरडून ओरडून मोठ्याना
गप्प बसावे लागते वारंवार
त्यांच्या आनंदात सामील होण्याशिवाय
मोठयाना नसतो तरणोपाय
चित्र त्यांची बघण्यातच
मोठ्याचा हारतो ऊपाय
कवयिञी-सौ.पुष्पलता.एन.कोळी .
13.सुरेशनगर जळगाव