Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2020
in राष्ट्रीय, लेख
Reading Time: 1 min read
६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’  चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

89 वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली.


गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्या वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. “अयोध्येचा राजा” या चित्रपटाने मा. दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या.


पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस ‘प्रभात फ़िल्म ‘ चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली.

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एच जे थीम महाविद्यालयात स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष

Next Post

सर सलामत तो पगडी हजार,हेल्मेट वापरले पाहिजे – वसंतराव मुंडे

Next Post

सर सलामत तो पगडी हजार,हेल्मेट वापरले पाहिजे - वसंतराव मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d