Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सर सलामत तो पगडी हजार,हेल्मेट वापरले पाहिजे – वसंतराव मुंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 2 mins read

पत्रकारदिन  व रस्तासुरक्षा अभियानांतर्गत पत्रकारांना हेल्मेटचे वाटप

सेल्फी पॉईंटचे उदघाटन ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि आरटीओ विभाग, नजर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

जळगाव -(प्रतिनिधी)-सर सलामत तो पगडी हजार ,हेल्मेट वापरले पाहिजे, हेल्मेट घालत नाही ते घातलेच पाहिजे कारण ८० टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे होतात . त्यामुळे सर सलामत तो पगडी हजार यासाठी हेल्मेट हे वापरलेच पाहिजे असे प्रतिपादन पाहिजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी हेल्मेट वाटपाच्या कार्यक्रमात केले . मराठी पत्रकारसंघातर्फे ३ वर्षांपासून हेल्मेट वाटपाचे कार्यक्रम होत असून जवळपास ११ हजार हेल्मेट वाटप करण्यात आले आहे असेही त्यांनी यावेळी सांगतिले.

वाहन चालविताना प्रत्येकाने स्वयंशिस्तता बाळगावी -डॉ. पंजाबराव उगले

वाहन चालविताना नियमांचे पालन अथवा अमलबजावणी होत नाही हे दुर्दैव आहे . दुचाकी अपघातांचे ८० टक्के प्रमाण असून हेल्मेट घातल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात . त्यामुळे हेल्मेट वापरण्याचे महत्व इतरांना पटवून सांगा. सामाजिक बांधिलकीचा वसा जपून प्रत्येक वाहनधारकाने स्वयंशिस्तता बाळगावी असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज येथे केले . पत्रकारदिन  व रस्तासुरक्षा अभियानांतर्गत ४५० वर पत्रकारांना हेल्मेटचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि आरटीओ विभागातर्फे करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित पत्रकारांनी सेल्फीचा आनंद लुटला . तसेच पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .

जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे ,अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही , दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी,देशदूतचे अनिल पाटील ,सकाळचे संपादक राहुल रनाळकर ,डीडी बच्छाव , माहिती अधिकारी श्री. बोडखे ,  प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे , गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील,पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,  विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.

हेल्मेट वापरून समाजासमोर आदर्श निर्माण करा -श्याम लोही

दुचाकीस्वारांनी हेल्मेट हे वापरलेच पाहिजे. यामुळे आपले प्राण वाचण्यास मदत होईल . हेल्मेटशिवाय मी दुचाकी चालविणार नाही असा निर्धार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले. ते म्हणाले कि , हेल्मेट वापरताना सुरुवातीला अवघड वाटेल मात्र काही दिवसांनी याची आपणास सवय होईल. दुचाकी धारकांनी एमएसएम अर्थात मिरर, साईड आणि वळण या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जवळपास ९० टक्के अपघात टाळले जाऊ शकतात . यासाठी हेल्मेट घातले पाहिजे असे आवाहनही श्याम लोही यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे , डीडी बच्छाव ,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आदींनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन शरद कुलकर्णी, नारायण पवार यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी वृत्तवाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, संतोष ढिवरे, दिपक सपकाळे, सुनील भोळे, नाजनीन शेख, भगवान मराठे, भूषण महाजन, चेतन निंबोळकर, गोपाळ सोनवणे, स्वप्नील सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

सेल्फी पॉइंट ठरले आकर्षण

हेल्मेटविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने सेल्फी पॉईंट  तयार करण्यात आले होते . याचे उदघाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले . प्रत्येक पत्रकारांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अनिल केऱ्हाळे सपत्नीक सत्कार

बिकट परिस्थितीतही पत्रकारिता करून पत्रकारांमध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या टीव्ही नाईनचे पत्रकार अनिल केराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. धावपळीच्या युगात काम करताना उद्भवलेल्या आरोग्याच्या बिकट परिस्थितीत पत्नीने दिलेली खंबीर साथ यामुळे  नव्याने  मिळालेलं जीवन याची  दखल महाराष्ट्र पत्रकार संघाने घेतली,  त्यांचा  यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात  आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

Next Post

“मॅनेज हो जायेगा” हे वाक्य उद्योजकांसाठी यशाची गुरुकिल्ली

Next Post

“मॅनेज हो जायेगा” हे वाक्य उद्योजकांसाठी यशाची गुरुकिल्ली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications