मुक्ताईनगर- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्या साहाय्याने मुक्ताईनगर येथे दिव्यांग बांधवाना तीन चाकी सायकलचे वितरण माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यामध्ये गजानन एकनाथ पाटील, हर्षल विजय पाटील सुकळी आणि देवानंद भावलाल पाटील शेमळदे यांना सायकली देण्यात आल्या. यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर ,रा स प जिल्हाध्यक्ष रविभाऊ पवार,बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, प स सदस्य विकासभाऊ पाटील ,विलासभाऊ धायडे, राजुभाऊ माळी, पुनमचंदजी जैन , योगेश कोलते सर उपस्थित होते.