<
जळगाव परिमंडळ- राष्ट्रीयमहा लोक अदालत शनिवार दिनांक 08 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित आहे. या महा लोक अदालतीत महावितरणच्या जळगाव परिमंडळातील धुळे, जळगाव व नंदुरबार मंडळातील वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित असलेल्या 10 हजार 20 वीज ग्राहकांची 19 कोटी 15 लक्ष रक्कमेची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. या संदर्भात संबंधीत ग्राहकांना पूर्वसुचना दिलेली आहे. तरी ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांनी केले आहे.
महावितरणचे प्रचलित नियम व ग्राहकांची विनंती यात समन्वयाने चर्चेतून तडजोडीचा मार्ग काढण्यात येणार आहे. महा लोक अदालतीत धुळे मंडळातील 1 हजार 328 प्रकरणे दाखल आहेत. त्यात विभाग निहाय धुळे शहर 412 ,धुळे ग्रामीण 667 व दोंडाईचा 249 प्रकरणे दाखल आहेत. प्रकरणे दाखल आहेत. त्यात विभाग निहाय धुळे शहर धुळे ग्रामीण व दोंडाईचा प्रकरणे दाखल आहेत. जळगाव मंडळातील 5 हजार 296 प्रकरणे दाखल आहेत. त्यात विभाग निहाय भुसावळ 481, चाळीसगाव 285, धरणगाव 1200, जळगाव शहर 214, मुक्ताईनगर 1393, पाचोरा 170, सावदा 1553 प्रकरणे दाखल आहेत. नंदुरबार मंडळातील 3 हजार 396 प्रकरणे दाखल आहेत. त्यात विभाग निहाय नंदुरबार शहर 1197 शहादा 2199 प्रकरणे दाखल आहेत. महा लोकअदालतीत दाखल प्रकरणी मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारूख शेख, धुळ्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौणिकर, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण , सर्व विभागाचे कार्यकारी अभिंयता, उपविभागीय अभियंता व कर्मचारी हे कामकाज करीत आहेत.