<
जळगाव (हर्षल सोनार)-आज नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर पोहचवण्यासाठी गेलो असता.रेल्वेला यायला उशिर झाल्यामुळे मी जवळजवळ दोन अडीच तास रेल्वे स्टेशन वर घालवले.स्टेशन वरून घरी परतत असतांना लघूशंका लागली यासाठी मी स्टेशनच्या दादर्या खाली असलेल्या मुत्रालयात गेलो.विधी संपवला,तेथुन निघतांना एका इसमाने आवाज दिला.भैय्या पैसे…..मी अवाक झालो राव
आजपर्यत देशातील प्रत्येक स्टेशनला स्नानगृह ( Bathroom) आणि शौचालय( Latrine) चा वापर करण्यासाठी थोडेफार पैसे मोजावे लागत असे पण आज जेव्हा #जळगाव रेल्वे स्टेशन पाहिले की आता लघुशंका ( #Urinal) चा वापर करण्यासाठी सुद्धा अक्षरशः पैसे द्यावे लागत आहे?
सरकार वर ऐवढे वाईट दिवस आले की काय त्यांना देशातील रेल्वेस्थानकावरील मुत्रालयांचा देखभाल दुरूस्तीचा खर्च जड झालाय. सगळीकडे सरकार Privatization करून देशाची पार वाईट स्थिती करताय.