<
जळगाव परिमंडळ – राष्ट्रीय महालोक अदालत शनिवार दिनांक 08 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न झाली. या महालोक अदालतीत महावितरणच्या जळगाव परिमंडळातील धुळे, जळगाव व नंदुरबार मंडळातील वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित असलेल्या व वीजचोरी दाखल पूर्व प्रकरणी 372 वीज ग्राहकांनी 24 लक्ष 79 हजाराची रक्कम तडजोडीअंती भरणा केली आहे.
महावितरणचे प्रचलित नियम व ग्राहकांची विनंती यात समन्वयाने चर्चेतून तडजोड झाली. महालोक अदालतीत धुळे मंडळातील धुळे शहर व धुळे ग्रामीण विभागातील 41 प्रकरणी तडजोड होऊन 4 लक्ष 84 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. जळगाव मंडळातील भुसावळ , चाळीसगाव , धरणगाव , जळगाव शहर , मुक्ताईनगर , पाचोरा , सावदा या विभागातील 220 प्रकरणात तडजोड होऊन 13 लक्ष 54 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. नंदुरबार मंडळातील नंदुरबार व शहादा विभागातील 111 प्रकरणात तडजोड होऊन 6 लक्ष 40 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. महा लोकअदालत यशस्वीतेसाठी मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारूख शेख, धुळ्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौणिकर, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण , सर्व विभागाचे कार्यकारी अभिंयता यांनी कामकाज पाहिले.