<
जिंकलेल्या स्पर्धकाला पदकं देऊन दिली शाबासकीची थाप
जळगाव(प्रतिनीधी)- जीवनात खेळाला खुप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायाम आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे असून खेळामुळे शारिरीक, बौध्दीक क्षमता वाढण्याबरोरबच आरोग्यही चांगले राहते आणि मन उत्साही होते आणि माणसाची दैनंदिन कामाकाजातील कार्यक्षमताही वाढण्यास मदत होते हा सुज्ञ दृष्टीकोन समोर ठेऊन तालुक्यातील कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम शाळेत वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पदकं व शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे तथा ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रायपूरचे सरपंच प्रवीण परदेशी, उमाळे चे माजी सरपंच अनिल खडसे, अविनाश स्टीलचे संचालक ईश्वर पाटील, साईमत लाईव्हचे संतोष ढिवरे, मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सत्यमेव जयतेचे पत्रकार चेतन निंबोळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला आलेल्या प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका कु.प्रतीक्षा पाटील तसेच मुख्याध्यापिका तनुजा मोती यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून सन्मानित केले. प्रसंगी लहान चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. शाळेत संपूर्ण वर्षभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये विविध खेळ, चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, रनिंग, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कला दाखविल्या यात जिंकलेल्या विद्यार्थ्यांना आलेल्या पालकांच्या समक्ष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करताना या शाळेत होत असलेल्या क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगीण संस्कारक्षम उपक्रमाची प्रशंसा केली. प्रसंगी वर्षभरात शाळेमधील माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धत राज्य स्तरावर आपल्या शाळेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरणाऱ्या आदर्श विद्यार्थ्यांच्या हस्ते चिमुकल्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा मुखेडकर व पूजा चौधरी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका तनुजा मोती यांनी मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.