<
नाशिक : तारवाला नगर चौफुली येथे पाच वर्षात अपघातांमध्ये ४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे.नियमितपणे होणाऱ्या अपघातांमुळे सामाजिक संघटनांच्या मागणीवरून मनपा प्रशासनाने वाहनांचा वेग नियंत्रणात यावा याहेतूने चौफुलीवर चारही बाजूने हम्प बसवून तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी त्यानंतर देखील या ठिकाणी १ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तारवाला नगर चौफुली येथे क्रॉसिंगपूरता उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी आमची आग्रही मागणीचे प्रसिद्धी पत्रक पंचवटी युवक विकास समितीने काढले आहे.
पंचवटी युवक समितीच्या वतीने अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी माहिती अधिकारात १ जानेवारी २०१५ पासून डिसेंबर २०२० याकाळात झालेल्या अपघातांची माहितीच्या अधिकारांत पोलीस प्रशासनाकडून मिळविण्यात आली या मध्ये पाच वर्षाच्या काळात पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवर तारवाला नगर सिग्नल चौक चौफुली येथे तब्बल १७ पेक्षा अधिक अपघात झाले आहे.त्यामध्ये ४ लोकांचा मृत्यू झाला.तर १४ जन जखमी झाले झाली असल्याची नोंद पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये आहे तर नोंद नसलेले देखील अनेक छोटे अपघात या ठिकाणी झालेले आहे.या अपघातांमध्ये प्रवासी बस म्हणजेच सिटी बस,प्रवासी वाहने रिक्षा,मालवाहतूक गाड्या,कार व मोटर सायकल यांचा समावेश आहे.या ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पाठपुरवा केला त्यामुळे मनपा प्रशासनाने वाहनांचा वेग नियंत्रणात यावा याहेतूने चौफुलीवर चारही बाजूने हम्प बसवून तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी त्यानंतर देखील या ठिकाणी १ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
शिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर वाहतूक कायम वर्दळ असते.शिवाय अमृतधाम ते हनुमान वाडी रिंग रोड पुढे गंगापूर रोडला जोडला आहे शिवाय दिंडोरी रोडवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, असल्यामुळे शेतकऱ्यांची व माल वाहतूक वाहनांची देखील कायम वर्दळ असते.
शिवाय मेरीचे प्रशासकीय कार्यालय.सिडीओ मेरी शाळा,काकासाहेब देवधर शाळा व कॉलेज,आरोग्य विज्ञानपीठ,महावीर कॉलेज ,म्हसरूळ येथील गावठाण वसाहत शिवाय नव्याने विकसित झालेल्या कॉलनी परिसरामुळे या मार्गावर कायम राबता असतो त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून या ठिकाणी क्रॉसिंगपूरता उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी आमची आग्रही मागणीचे प्रसिद्धी पत्रक पंचवटी युवक विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत, कार्याध्यक्ष किरण पानकर,उपाध्यक्ष धनंजय कोठुळे ,सरचिटणीस सचिन दप्तरे,खजिनदार अजित पाटील, चिटणीस संतोष जगताप,संघटक साहिल बैरागी ,सहचिटणीस रोहित सानप,वैजनाथ कड,सागर दवंडे,रोहित राजहंस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.