<
चाळीसगाव – (प्रतिनिधी) – नोकरीच्या मागे न लागता, आहे तो उद्योग करून इतरांना नोकरी,उद्योग व रोजगार देणारा घटक कसा होता येईल हा ध्यास घेणारा समाज,तसेच आहे त्या परिस्थितीत मात करून अडथळे पार करीत उद्योगाची कास धरणारा समाज म्हणून वाणी समाज ओळखला जातो. वाणी समाजाने उद्योगासाठी लागणारी चिकाटी आणि जिद्द यातून मोठी प्रगती साधली आहे. या विविध सामाजिक क्षेत्रात कर्तृत्ववान समाज बांधवाचा गौरव करून प्रोत्साहन फाउंडेशनने आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आज सकाळी अकरा वाजता चाळीसगाव येथील वाणी समाज मंगल कार्यालयात “प्रोत्साहन फाऊंडेशन” च्या वतीने गौरव सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
आज लाडशाखीय वाणी समाज मंच मित्र मंडळ संचलित प्रोत्साहन फाउंडेशन कला मंच महाराष्ट्र आयोजित लाडशाखीय वाणी समाजातील सामाजिक ,शैक्षणिक कर्तृत्ववान बंधू भगिनी यांचा गौरव करताना केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते तर रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा दिदी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा आज सकाळी अकरा वाजता चाळीसगाव येथील वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाला.यावेळी भालचंद्र बागड (सटाणा),सुरतचे उद्योजक तसेच वाणी समाज आंतरराष्ट्रीय समिती सदस्य कल्पेश दुसे,चाळीसगाव वाणी समाज अध्यक्ष शरद मोराणकार,पारोळा समाजाध्यक्ष किरण बागड,नंदुरबार समाजाध्यक्ष प्रमोद भदाणे, कासोदा समाजध्यक्ष प्रदीप बाविस्कर,आयोजक तथा प्रोत्साहन फाउंडेशन अध्यक्ष गिरीश वाणी, कला मंच अध्यक्षा शीतल येवले यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
माझ्या कार्यात वाणी समाज पाठीशी – नीलिमा दीदी मिश्रा
वयाच्या तेराव्या वर्षी मी समाजसेवेचा निर्णय घेतला त्यावेळी शेजारी असणारे वाणी काका यांनी हिंमत दिली.पुढच्या वाटचालीत वेळोवेळी वाणी समाजाचे भरीव योगदान राहिले आहे.अशी भावना नीलिमा दीदीयांनी व्यक्त केल्या.याप्रसंगी विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.शेवटी नाशिकच्या गायिका पूनम अमृतकार यांनी पसायदान सादर केले.