<
सीई सोसायटी संचालित केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर दि.9 ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
शिबिराचे उद्घाटन विद्यालयातील इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी गायत्री पवार हिच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.संतोष खिराडे (विभागीय समन्वयक एन.एस.एस.जळगाव) , शोभाताई दिनेश सोनवणे , (सरपंच मोहाडी ) , लीलाताई सोनवणे (माजी सभापती जि. प.जळगाव) ,मुख्या. साधना लोखंडे , प्राचार्य डॉ.अशोक राणे , कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी , प्रवीण कोल्हे , तसेच प्रमुख वक्ते योगेश भालेराव , धीरज चौधरी आदी उपस्थिती होते.
सदर शिबिरामध्ये दररोज सकाळी व्यायाम व योगासने , प्रार्थना , विचारकर्णिका , श्रमदान , व्याख्यान , खेळ , सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण तसेच ग्रामसफाई ,प्लास्टिक मुक्त अभियान , तंबाखूमुक्ती अभियान , बेटी बचाओ बेटी पढाओ , पथनाट्य , प्रभातफेरी तसेच स्मशानभूमी स्वच्छता असे विविध उपक्रम शिबिरात राबवले जाणार आहे .