<
जळगाव : एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
विद्यार्थ्यांवर आपल्या मातृभाषेचा प्रभाव जन्मजात असतो. परंतु बाहेरील स्पर्धात्मक युगात त्याला टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने एसडी सीड तर्फे “इंग्रजी संभाषण कौशल्य” या विषयावर मानवसेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे श्री अभिजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेला अनन्य साधारण महत्व आहे. ती एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजी संभाषण हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी जर आपल्या जीवनात, करिअर मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शैक्षणिक प्रगतीसोबतच प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित केले पाहिजे तरच आपल्याला यशाच्या अनेक वाट खुल्या होतील असे प्रतिपादन श्री कुलकर्णी यांनी कार्यक्रमप्रसंगी केले.
विद्यार्थ्यांवर आपल्या मातृभाषेचा प्रभाव जन्मजात असतो. विद्यार्थ्यांचे विचार, आचार हे त्यांच्या व्यावहारिक घडामोडीतून प्रगट होतांना आपणास दिसतात. परंतु बाहेरील स्पर्धात्मक युगात त्याला टिकून राहण्यासाठी त्याच्या मातृभाषे बरोबरच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु जसजसा विद्यार्थ्यांचा बाहेरील जगाशी संपर्क वाढतो तेव्हा त्याला समोर येणाऱ्या परिस्थितीशी समायोजन करावे लागते. आपले विचार इतरांपर्यंत जसेच्या तसे पोहोचणे हे सुद्धा महत्वाचे असते तरच प्रभावी संप्रेषण होईल. म्हणून आपल्या विकासामध्ये प्रभावी संभाषणाला महत्वाचे स्थान आहे.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिक सौ. प्रतिभा सूर्यवंशी, एसडी सीड समन्वयक श्री प्रवीण सोनवणे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्र संचालन श्री. गिरीश जाधव यांनी केले तर आभार सौ. अनिता शिरसाठ यांनी मानले.
हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी आणि विद्यालय व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे