<
आता टीव्ही वर एक कार्यक्रम पोलिसांवरील बघत होतें आणि कवितेच्या ओळी सहज सुचत होत्या
पोलीसातील माणूस
पोलिसाला ही एक मन असते
एक वर्दी सोडली तर
तो ही आपल्या सारखाच सामान्य
माणूस असतो
त्या वर्दीतही दर्द असतो तो कोणालाही दिसत नसतो
घर,दार, संसार सोडून तो
इतरांच्या रक्षणासाठी तो
झिजत असतो म्हणूनच आपण
घरात निवांत झोपत असतो…
या ओळी सुचल्या आणि थोडे लिहावेसे वाटले माझ्या माहेरी पोलीस खात्यात आजोबा, वडील भाऊ सारेच देशाची सेवा करत आहे आणि होते त्यांचे जीवन मी जवळून पाहिले आहे वडिलांच्या पायात जाड खिळ्यांचे बूट असायचे सायकल वर ते जायचे यायचे पाय त्यांचे दुखायचे आजी च्या जवळ ते लहान बाळा सारखे आजी त्यांच्या पायाला तेल लाऊन चेपायची खुप वाईट वाटायचे आपले वडील आपल्या साठी किती सहन करतात जवळ पासचे लोक नातेवाईक पोलिसांची मुले म्हणून हिंवायची मनात राग यायचा पण वडिलांचा आदर वाटायचं कारण त्यांनी कधी आम्हाला काही कमी पडू दिले नाही आणि कोना कढे हातही पसरू दिला नाही स्वाभिमान मनाने त्यांनी जगणे शिकवले आपल्या जवळ नसले तरी समोरच्या ने काही मागितले तरी ते होईल ते देण्याचं प्रयत्न करायचे आज ते नाही पण त्यांनी आणलेला खाऊ अजूनही आठवतो त्या वेळी चित्रा चौकात करंजी एवढे पेढे मिळत आता ते मिळत नाही आता फक्त आठवणी आहेत जी लोक चिडवायची त्याचे आज काहीच शिल्लक राहिले नाही आणि आम्ही किती तरी पटीने समाधान ने जीवन जगत आहोत कोणतीही कोणा कडून अपेक्षा न करता.
पण तरीही एक प्रश्न मनाला त्या वेळी पडायचा की खाकी वर्दीच का पोलिस घालत असतील आजोबांना विचारले त्यांनी सांगितले की पूर्वी पोलीस पांढरी वर्दी परिधान करायचे परंतु ड्युटी लांब असल्यास ही वर्दी लवकरच खराब होई ती खराब होऊ नये म्हणून पोलीस नीळ वापरायचे हे बघून अधीकाऱ्यांनी एक खाकी डाय तयार केली पिवळा रंग आणि चहाचे पाणी वापरून हा खाकी रंग तयार झाला या रंगांमुळे वर्दी वर येणारे माती पाणी चहा यांचे डाग दिसत नव्हते इ,स,1947 मध्ये हैरी ल्म्सडेन यांनी खाकी रंग पोलीस करिता स्वीकार ला आणि तेव्हा पासून भारतीय पोलिसांच्या वर्दी चा रंग खाकी झाला लिहावेसे वाटले म्हणून लिहिले.
मीना सौंदाने जळगाव
9403385310