<
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १० जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली. यात चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची “रंगबावरी” हि एकांकिका प्रथम आली.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, डॉ.मोहन पावरा, रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्यासह परीक्षक पुणे येथील नितीन धनधुके, भुसावळ येथील अनिल कोष्टी, जळगावच्या मंजुषा भिडे उपस्थित होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांक भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाची “चिमणी”, तृतीय क्रमांक डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची “शाली” यांना मिळाला. उत्तेजनार्थ बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेच्या लाल चिखल या एकांन्कीकेने पटकावला.
उर्वरित निकाल –
उत्कृष्ट लेखन – धनश्री जोशी (चिमणी), उत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम वैष्णवी सोनार (रंगबावरी), द्वितीय बुद्धभूषण अहिरे (चिमणी), उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम – दिपेश शुक्ल (रंगबावरी), द्वितीय – वेदाली जोशी (चिमणी), उत्कृष्ट रंगभूषा – प्रथम – साक्षी बिडकर (रंगबावरी), द्वितीय – दिपाली ठोसर (चिमणी), उत्कृष्ट प्रकाश योजना – प्रथमेश जोशी (चिमणी), द्वितीय- प्रमोद गुरव (रंगबावरी), उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम – वैष्णवी सोनार (रंगबावरी), विनोद पवार (चिमणी), पुरुष अभिनय – राहुल निकुंभ (रंगबावरी), द्वितीय – दर्शन गुजराथी (चिमणी), स्त्री अभिनय – प्रथम – दीप्ती पाटील (रंगबावरी), द्वितीय – धनश्री जोशी (चिमणी), अभिनय प्रशस्तीपत्रे – स्वप्नील नन्नवरे (चिमणी), श्रीकांत दाभे, अंकुश काकडे (दोन्ही लाल चिखल), शालिनी कोळी, भूषण ननवरे (दोन्ही शाली), साक्षी वाणी (रंगबावरी)