<
जळगांव(प्रतिनीधी)- आपली भुमी ही पुरोगामी विचारांची आणि आपल्या महापुरुषांच्या विचारांची आणि साधू संतांच्या पायाने पावन झालेली आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज स्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी झुंज दिली आणि याच भूमीत हिंगणघाट सारख्या घटना घडण्या या मनुष्यजातीला काळ फासायसारख्या आणि लाजिरवाण्या कृत्य आहे. दि. ३फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथे एका तरुणीला पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. काल आपल्या महाराष्ट्रातील एक जबाबदार ताईचा मृत्यू झाला. अश्या घटना आरोपींवरती शासन कठोर कारवाई करत नाही. स्त्री रक्षणासाठी वेगला कठोर कायदा नाही त्यामुळे समाजातील निर्दयी लोकांना कायद्याची भीती त्यांच्या मनातून निघून गेलीय. आता जर या घटनेतील आरोपीने कठोर कारवाई केली नाही तर परत अस घडायला वेळ नाही लागणार आणि या घटना वाढत राहतील. हिंगणघाट येथे घडलेल्या कृत्यातील आरोपीला तसाच पेट्रोल टाकून जाळण्याची शिक्षा सुनावण्यात यावी आणि हे प्रकरण निर्भया सारखे नलांबत लवकरात लवकर सोडवावे अशी अपेक्षा ठेवत अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून विर भगतसिंग विद्यार्थी परिषद जळगांव जिल्हा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे जिल्हाध्यक्ष शिवश्रीरुपेश विलास महाजन, शहर कार्याध्यक्ष शिवश्री हर्षवर्धन खैरनार, शिवश्री रोहन महाजन शिवश्री गौरव पाटील, प्रेम पाटील, जयेश चौधरी, अमीत भावसार, गणेश सोनार, दर्शन पाटील, श्रेयस वर्मा आदी उपस्थित होते.