Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव-(जिमाका) – अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, तसेच खरा गुन्हेगार निर्दोष सुटता कामा नये. याकरीता अशा गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांसाठी पोलीस विभागाने स्वतंत्र प्रशिक्षणाचे आयोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्यात.

            जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲङ केतन ढाके, समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अहिरे, जिल्हा महिती अधिकारी विलास बोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांचेसह समाजकल्याण  विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणार नाही. तसेच गुन्हेगाराची निर्दोष सुटका होवू नये. याकरीता चार्जशीट बनवितानाच पोलीस विभागाने आवश्यक ती काळजी घ्यावी. जेणेकरुन गुन्हेगार निर्दोष सुटणार नाही. असे डॉ. ढाकणे यांनी पोलीस विभागास सांगितले. या बैठकीमध्ये डॉ. ढाकणे यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेतली. तपास लवकरात लवकर पूर्ण करुन दोषारोपपत्र वेळेत दाखल होण्यासाठी पोलीस विभागाने जिल्हा सरकारी वकिलांचा सल्ला घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. अत्याचार पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना बैठकीत दिल्यात.

            प्रारंभी  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे डिसेंबर अखेर अनुसूचित जाती संदर्भातील 13 तर अनुसूचित जमाती संदर्भातील 3 असे एकूण 16 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 8 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 8 व जानेवारीमध्ये दाखल झालेले 6 असे एकूण 14 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये विनयभंग-1, दुखापत/गंभीर दुखापत-1, खुनाचा प्रयत्न-2 व इतर-10 प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.    त्याचबरोबर जानेवारी 2020 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 8 पिडीतांना 5 लाख रुपयांचे तर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर 7 पिडींताना 4 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आल्याचेही श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाईट लाइफ ची नाही तर महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

Next Post

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Next Post

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo