<
जळगाव- (जिमाका) – धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतंर्गत सन 2019-2020 मध्ये अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक विभागाच्या 16 जानेवारी, 2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय क्रमांक अविवि/2015/प्र.क्र/15/का.6 दि.7 ऑक्टोंबर 2015 मधील अटी व शर्तींनुसार विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जळगाव प्रतापराव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.