जळगाव-(जिमाका)-राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दि. 13 फेब्रुवारी, 2020 रोजी अमृतसर एक्सप्रेसने सकाळी 6.10 वाजता जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन, सकाळी 6.30 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मुद्रा बँक योजना मेळाव्यास उपस्थिती. आयोजक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (स्थळ:- केसीई सोसायटी पटागंण, जळगाव), दुपारी 12.30 वा. कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर व शेत अवजारे वाटप (स्थळ :- प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. जळगाव जिल्ह्यातील अभ्यांगतांच्या भेटी. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सांयकाळी 5.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.