<
तंत्रज्ञान लुप्त होत नाही त्याचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण होत असते-मनोज भालेराव
जळगाव (प्रतिनिधि): आज जागतिक रेडिओ दिवस हा दिवस १३ फेब्रुवारी २०१२ पासून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी ओळख रेडिओची हा उपक्रम घेतला. यात त्यांनी आपल्यातून लुप्त होत असलेल्या रेडिओचे महत्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष रेडिओ आणून त्यांना रेडिओ संबंधी माहिती दिली व रेडिओच्या विविध भगांची ओळख करून दिली.तसेच विद्यार्थ्यांना रेडिओ चा प्रत्यक्ष वापर कसा करतात हे प्रात्यक्षिक करून दाखवत रेडिओवर विविध कार्यक्रम लावून दाखवले.वारंवारिता बदलली की कशापद्धतीने एखादे केंद्र बदलते हे बघुन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघण्यासारखे होते.या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे व शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण हे उपस्थित होते.