<
जळगाव : एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
विद्यार्थ्यांजवळ भरपूर प्रमाणात ज्ञान असूनही प्रभावी मुलाखत तंत्राच्या अभावामुळे विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात जीवनात यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याच्या मुलाखत कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने एसडी सीड तर्फे “मुलाखत तंत्र” या विषयावर नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अंड टेक्नोलोजी, जळगाव येथे प्रा अभिजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, प्रत्येक विद्यार्थी किंवा युवक यांच्या डोळ्यासमोर दोनच उद्दिष्टे असतात ते म्हणजे चांगले शिक्षण व चांगली नौकरी. चांगली नौकरी मिळणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यासाठी युवकांनी पुढील पायऱ्या चढत जाऊन वेगवेगळ्या कसोट्या मधून उत्तीर्ण होऊन आपले जीवन उद्दिष्ट पूर्ण करायचे असते. त्यात अर्ज करणे , पूर्व परीक्षा, लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादी होय. आपण मुलाखत कशी देत आहोत? त्याचा नेमका उद्देश काय आहे? याचे ज्ञान आपणास अवगत पाहिजे. विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जातांना काय काळजी घ्यावी, प्रत्याक्ष् मुलाखतीला कसे सामोरे जावे? चांगली मुलाखत कशी देता येईल आणि मुलाखती दरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्यात या विषयी मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील टिप्स दिल्यात
· मुलाखतीला जातांना वेळेच्या आधी पोहचा
· आपले सर्व कागदपत्रे व्यवस्थित फाईल मध्ये ठेवली आहे किंवा नाही ते तपासा
· आपल्या बायोडाटा च्या दोन किंवा तीन प्रती सोबत ठेवा
· आपला पोशाख व्यास्थित असावा जास्त भडक कपडे घालू नये
· आपण मुलाखतीच्या ठिकाणी पोहचल्यावर तेथील प्रतिनिधीस कळवा
· विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देऊ नका
· मोबाईल बंद करून ठेवा
· आपल्या कमतरता त्यांच्या प्रदर्शनास आणू नका
कार्यक्रमाला कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही.एम. पाटील , एसडी सीड समन्वयक श्री प्रवीण सोनवणे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते-
हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही.एम. पाटील आणि कॉलेज चे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.