<
जळगाव-(प्रतिनिधी)-डॉ सुमंत सरस्वती श्री स्वामी सखा आठल्ये (श्रीसर) यांना बँकॉक येथे ” राष्ट्रकुल व्यावसायिक विद्यापीठ ” मधून ” अध्यात्म” या विषयामध्ये मध्ये डॉक्टरेट मिळाली. खेड्यातून असंख्य स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झालेल्या, आणि अत्यंत कष्टातून वाटचाल करीत “अध्यात्म” या विषयात आकाशझेप घेणाऱ्या एका ध्येयवेडया व्यक्तीचा हा अनोखा सन्मान असल्याचे त्यांच्या शिष्य मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.
डॉ सुमंत सरस्वती स्वामी सखा हे धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथील श्री स्वामी समर्थ गुरुपद्म आश्रमाच्या वास्तुशांतीसाठी व श्रीदत्त पंचमी उत्सव कार्यक्रमासाठी ते जळगावात आले होते. एका खाजगी हॉटेलात आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनोज जोशी, दीपक बाविस्कर, किशोर जैस्वाल, संतोष ठाकूर, नितीन महाजन उपस्थित होते.
या डॉक्टरेटसाठी जगभरातून एकूण २५०० प्रोफाइलचे विश्लेषण केले गेले, त्यापैकी निवडक १७ जणांना चर्चेसाठी आणि १२ जणांना डॉक्टरेटसाठी निश्चित करण्यात आले. श्री स्वामी सखा म्हणजेच श्री सर या १२ जणांपैकी एक होते. “अध्यात्म” या क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त करणारे श्री सर हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्तीमत्व असून .
1976 साली एका खेडेगावातून ते शहरात आले. असंख्य स्वप्ने आणि उत्तुंग ध्येय मनातून ठेवून फक्त एक ट्रंक आणि चटई घेऊन ते मुंबईत (नेरळ )ला दाखल झाले आणि आज 2020 मध्ये त्यांना अध्यात्मातील “तत्त्वचिंतक विद्यावाचस्पती” ही पदवी मिळाली.
श्री सर यांच्या संकल्पनेतून विकसित झालेला “समर्थवाडी” हा प्रकल्प भव्यदिव्य आहे. त्यातील दत्तमंदिर ,गुरूपंचयातन दिव्यत्वाची प्रचिती देणारे आहेत.
समर्थवाडीत उभ्या केलेल्या गुरुपंचायतन मंदिराला भारताच्या थोर अध्यात्मिक संस्कृतीचा वारसा सांगणारी शिल्पकृती म्हणून मान्यता मिळेल याची सर्वांनाच खात्रीआहे. तसेच इथे सुर्यमंदिराची कलाकृती आहे जी 21 अक्षांशवर आहे. हे मंदिर कलाकृती म्हणून उत्तम आहेच पण अध्यात्मिक शांतीची ओढ असलेल्या प्रत्येकालाच ते वेगळी अनुभूती देते. डॉक्टर यांना स्वामी सखा श्री सर अशा अनेक उपाधी दिले आहे