<
जळगाव – येथील इंडिअन रेडक्रॉस जळगाव शाखेचे सहसचिव ज्यूनिअर-युथ रेडक्रॉस चे चेअरमन राजेश यावलकर यांना पाळधी येथील इम्प्रिरिअल स्कूल च्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रक्तदाता नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
राजेश यावलकर यांनी आतापर्यंत ८५ वेळा रक्तदान केले आहे तसेच रक्तदानासाठी सतत प्रोत्साहन देणे आणि जनजगृती निर्माण करणे या सह रक्तदानाविषयी जनतेतील गैरसमज दूर करून प्रोत्साहन देण्याचे कार्य यावलकर सतत करीत आहे म्हणून राजेश यावलकर यांचा रक्तदाता नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इम्पिरिअल स्कूल च्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी देखील जळगाव जिल्ह्यातील १२ जणांच्या प्रशंसनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
इम्पिरिअल स्कूलचे चेअरमन नरेश चौधरी यांनी यावेळी सुरवातीला प्रास्ताविक केले. व्यासपीठावर धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, मुख्याध्यापक सी के राजू, विजय चौधरी, गजानन पाटील संध्या चौधरी, विद्या पाटील उपस्थित होते.