<
एरंडोल – (प्रतिनिधी) – येथील शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक श्री.स्वप्नील उनवणे साहेब आणि सर्व पोलिस कर्मचारीवृंद यांनी खडके बु .ता.एरंडोल येथिल अनाथ निराधार मुल आणि मुलींच्या बालगृहात बालकांना लागणारे जिवनावश्यक साहित्य कोलगेट, ब्रश, अंगोळीचे व कपडे धुण्याचे साबण, तेल बॉटल , बिस्कीटपुडे इत्यादी साहित्य वाटप केले . संस्थेतील बालक विकास पाटील याचा वाढदिवस असल्यामुळे स्वतः साहेबांनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी एरंडोल शहरातील लोकनियुक्त नगरअध्यक्ष भाऊसो रमेशभाऊ परदेशी, एस किशोरभाऊ निंबाळकर मा.नगरअध्यक्ष, राजेंद्र चौधरी मा.नगरअध्यक्ष, शालीकभाऊ गायकवाड मा.मार्केट कमिटी सभापती, अशोक भाऊ चौधरी जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबिसी सेल ,विजय आण्णा महाजन मा.नगरसेवक, रविंद्र पाटील राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणिस ,योगेश महाजन नगरसेवक ,आनंदाभाऊ चौधरी (भगत), राजुभाऊ धनगर चेअरमन वि.का.सो.सोसायटी खडके बु., आल्हाद भाऊ जोशी, पो.कॉ.सुभाष पाटील, पो.कॉ.संदिप पाटील, वाल्मीक पाटील देशदुत पत्रकार , अतुल चव्हाण पत्रकार इ.मान्यवर ऊपस्थित होते . मान्यवरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केल. अल्हाद भाऊंच्या मार्गदर्शनामुळेच अनाथ मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी उपक्रम राबवितांना मोठे समाधान वाटत असल्याचे मनोगतात व्यक्त केले. या बालकांना पाहुन सर्वच मान्यवर भाराऊन गेले त्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या परिने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आणि लवकरच एक प्रेरणादायी उपक्रम सुरू करून मुलांसाठी मदत करण्याचे आश्वसन साहेबांनी दिले. याप्रसंगी संस्थाउपाध्यक्ष सचिन पाटील यांनी संस्थेविषयी माहीती दिली. सुत्रसंचलन प्रमोद पाटील यांनी केले तर अधिक्षक मधुकर कपाटे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी तुषार अहिरे , ज्ञानेश्वर पाटील, गणेश पंडीत, ॠषीकेश ठाकरे, यांनी परिश्रम घेतले.