<
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस खरेच हा दिवस असावा का, ही
पाश्त्यात संस्कृती आहे प्रेम करायला काही वेळ काळ असते का मला प्रश्न पडतो
प्रेम ही व्यक्त करण्याची भावना असते आपण आई, वडिल, मुले ,पशु, पक्षी यांच्या वरही आपण प्रेमच करतो
एक गाणे येथे आठवते
मी कशी ओळखू प्रीती
हे हुंदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे
देवा घरचे देणे
खरेच ते एक देणेच असते
प्रेम हे एक सारखे नसते प्रेमात शारीरिक आकर्षक नसावे निस्वार्थ असावे
वि, स, खांडेकर यांची ययाती ही कादंबरी जर वाचली तर कळेल तर प्रेमाची व्याख्या काय आहे
जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे पण कर्तव्य ही तिच्या पेक्षा ही शेष्ठ अशी भावना आहे
प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे
या जगात जो तो आपापल्या करिता जगत असतो हेच खरे वृक्ष वेलीची मुळे जशी जवळच्या ओल्या वाकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात याला जग कधी प्रेम म्हणते कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते, पण खरोखरच हे आत्मप्रेम असते
आपल्या साठी दुसऱ्या च्या डोळ्यात अश्रू आलेले पाहण्यात अपूर्व आनंद असतो नुसता आनंदच नाही मोठा धीर असतो त्या अश्रुत हे ही प्रेमच असते
जिथे माणूस पाषाण होतो तिथे पाषाण पासून माणुसकीची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे असे खांडेकर म्हणतात
माझ्या मते प्रेम सर्वांवर करा या सृष्टी वर चराचरावर मुक्या प्राणावर निसर्गावर करा पण मनापासून करा
लेखिका-मीना सैदाणे, जळगाव MOB- 9403385310