<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनल मध्ये गेल्या १६ वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस व्हँलेंटाईन डे न साजरा करता हा दिवस “आजी-आजोबा” दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचप्रमाणे यावर्षी सुद्धा १४ फेब्रुवारीला आजी-आजोबा हा दिवस साजरा करण्यात आला. आता पर्यंत उज्ज्वल च्या विद्यार्थांनी कधी वृद्धाश्रमात, देवळात तर कधी कष्ट करणार्या मजुरांसोबत हा आजी-आजोबा दिवस साजरा केला आहे. त्याचीच पुनावृत्ती म्हणून यंदा विद्यार्थांना त्यांच्या आजी-आजोबा सोबत आमंत्रीत करण्यात आले होते. सर्वप्रथम विद्यार्थांनी आलेल्या आजी-आजोबांचे स्वागत स्माईली लावून केले तसेच बालवाडीच्या विद्यार्थांनी आलेल्या प्रत्येक आजी-आजोबांना ग्रीटींग कार्ड देऊन पाया पडून नमस्कार केले. शाळेच्या अध्यक्षा सौ.अनघा गगडाणी विस्वस्थ श्री. प्रवीण गगडाणी यांनी हवेत आजी-आजोबांच्या प्रेमाचे संदेश असलेले फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व नववीच्या विद्यार्थांनी गणेश वंदना सादर करुन कार्यक्रमाची सुरवात केली. विद्यार्थांनी आजी आजोबांकरीता प्रेम व्यक्त करण्यासाठी कवीता सादर केल्या तसेच १ली ते ६वीच्या विद्यार्थांनी मनमोहक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. आजी-आजोबांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. आलेल्या आजी-आजोबांसोबत संगीत खुर्ची, प्रश्न मंजुशा, पासींग द बाँल असे विविध खेळ खेळून कार्यक्रम मनोरंजनात्मक केला तसेच आजी-आजोबांनी नातवंडासोबत डबा खाऊन डब्बा पार्टिचा आनंद घेतला. आजी-आजोबा हे ज्ञानाचे भांडार म्हणून नेहमी आपल्या नातवंडांना मार्गदर्शन करत असतात म्हणून विद्यार्थांना आपल्या आजी-आजोबांसोबत दिवस घालवता यावा, तसेच विद्यार्थांना आजी-आजोबां विषयी आपुलकी निर्माण व्हावी तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून मुलांना आपल्या आजी-आजोबांप्रती प्रेम व्यक्त करता यावे म्हणून हा दिवस उज्ज्वलचे विद्यार्थी आजी-आजोबा दिवस म्हणून साजरा करतात. शाळेचे माजी विद्यार्थी सुद्धा बाहेर राहून हा दिवस आजी-आजोबा दिवस साजरा करुन समाजात एक आदर्श निर्माण करतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक वृदांनी बहारदार नृत्य सादर करुन कार्यक्रमाचा शेवट गोड केला तसेच विविध खेळांमधील विजेत्या आजी- आजोबांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानसी जांगीड व चैत्राली काळे या विद्यार्थांनी तर शिक्षीका पुजा गुप्ता यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्षा सौ.अनघा गगडाणी व विस्वस्थ श्री. प्रविण गगडाणी व मुख्याध्यापिका मानसी भदादे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृदांनी परिश्रम घेतले.