<
जळगाव : येथील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या एच.जे.थीम महाविद्यालय आणि इकरा शाहीन उर्दू ज्युनियर महाविद्यालय येथे पुलवामा येथे वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक यांनी आदरांजली वाहिली.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव हाजी गफ्फार मलिक, प्राचार्य डॉ.सय्यद शुजाअत आली, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ. इक्बाल शहा उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मौन पाळत शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली. यावेळी गफ्फार मलिक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.करीम सालार म्हणाले की, पुलवामा हल्ल्याचा निषेध आहे. शासनाने या हल्ल्यामागील दोषींना अटक करून कठोर कारवाई करावी, हा हल्ला अमानवी व अमानुष होता, असेही डॉ.सालार म्हणाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आय,.एम.पिंजारी, डॉ.वाय.ई.पटेल, प्रा.फरहान शेख, डॉ.राजेश भामरे, डॉ.चांद खान, प्रा.साजिद मलक, डॉ.फिरदौस सिद्दिकी, डॉ.शबाना खाटिक, डॉ. सदाशिव डापके उपस्थित होते.