<
भराडी ता.जामनेर -(प्रतिनिधी) – सालाबाद प्रमाणे यावर्षी भराडी गावात श्री ‘शनी कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह ‘आयोजले असून ह.भ.प.श्री.जितेंद्र महाराज,ह.भ.प.श्री. कल्पेश महाराज(भागवत धर्म प्रवचक), ह.भ.प.श्री.नरेंद्र महाराज, ह.भ.प.श्री.ईश्वर महाराज,ह.भ.प.श्री.कन्हैया महाराज, ह.भ.प. श्री.सदानंद महाराज. ह.भ.प. श्रीमती मालतीताई महाराज, पवन महाराज, विठ्ठल महाराज, मयूर महाराज, राहुल महाराज यांच्या कीर्तनाची मेजवानी गावातील व पंचक्रोशीत असलेल्या मंडळीला ऐकायला मिळाली . तसेच ‘हरिनाम सप्ताह’ ची सांगता गावात शनिदेवाची पालखी काढून गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीचा मान श्री. रामजी धनगर ,भिका सुतार,राजू न्हावी यांना मिळाला.शनैश्वर भजनी मंडळाचे सदस्य चंद्रकांत(आबा) पाटील, शिवाजी पाटील(ग्रामपंचायत सदस्य),ज्ञानदेव शिंदे, राजू पाटील,आप्पासो.संभाजी पाटील,’गावातील तरुण मित्र मंडळ’ यांची उपस्थिती लक्षणीय होती.’यारे यारे लहान थोर ,यात भलती नारी नर’ वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र जोपासत स्त्री-पुरुष समानता ,समता बघायला मिळाली.’ज्ञानोबा-तुकाराम’ नावाचा गजर लावत पांडुरंग विठ्ठलाच्या रस भक्तीने विष्णुमय वातावरण बघायला मिळाले.या भक्ती-भावाच्या वातावरणामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ‘हेचि ज्ञान देगा,तुझा विसर न व्हावा’ असा नाममंत्र जपत मांदियाळी सोहळा पुन्हा-पुन्हा येवो.ह.भ.प.सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भराडी ते मेहुन’ शनिदेवाचा रथ घेऊन पायदिंडी निघणार आहे तरी भाविक भक्ताने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.रात्री ह.भ.प.संजय महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली .