<
जळगाव – (प्रतिनिधी) – शहरात सध्या RTO सह शहर वाहतूक विभागाकडून हेल्मेट, सिटबेल्ट, अवैध प्रवासी कारवाई जोर धरू लागली आहे. जनसामान्यांपासुन ते सर्वांनाच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
परंतु जळगाव तहसीलदार यांच्या वाहनाचा अर्धवट नंबर सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून हा मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय अपराध असतांना याकडे मात्र आरटीओ सह शहर वाहतूक विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकात होत आहे.
एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून वाहन नियमांच होत असलेल उल्लंघन हे कितपत योग्य आहे. असा प्रश्न देखील आता जनता विचारू लागली आहे.
सामान्य जनतेडून भरगोस दंड वसूल करणारे आरटीओ कार्यालय मात्र या विषयावर मूग गिळून गप्पगार का?
आरटीओ कार्यालयाकडून तहसीलदार यांच्या वाहनावर कारवाई होइल का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सर्वांना न्याय समान असला पाहिजे. मग तो कोणीही असो. इथं मात्र आरटीओ कडून घटनेच्या या मूलभूत तत्त्वाला छेद देण्याचं कृत्य होत आहे.
तहसीलदार यांच्या वाहनाचा नंबर MH-19-0557 असा असून वाहनावर असलेली नंबर प्लेट MH-19- 557 या क्रमांकाची आहे. हा अपराध सामान्य माणसाकडून घडला असता तर कारवाई झाली नसती का? असा देखील प्रश्न जनसामान्यांपासुन ते सुज्ञ नागरिकांना निर्माण झाला आहे. शहर वाहतूक विभाग यावर काय कारवाई करणार? अखेर तहसीलदार यांच्या वाहनाचा नंबर दुरुस्त होईल का?