<
जळगाव(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांच्या हातून विज्ञान शैक्षणिक साहित्य निर्माण व्हावे या उद्देशाने प्रगती शाळेतील विज्ञान शिक्षक मनोज भालेराव यांनी पिनहोल कैमरा बनविने ही कार्यशाळा घेतली.यात विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग नोंदवून कैमरा बनविण्याच्या कृती विषयी मार्गदर्शन केले व विविध पिनहोल कैमरे बनवून घेतले.प्रत्यक्ष त्या कैमेरांचा प्रयोग बघुन विद्यर्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आश्चर्य दिसून येत होते.छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ही विज्ञान लपलेले आहे या गोष्टीचा आंनद त्याना होत होता.या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे प्रेमचंदजी ओसवाल यांनी करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी असे सांगितले तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यानी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,शिक्षक रमेश ससाने,पंकज नन्नवरे शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण उपस्थित होते.